Advertisement

बूथ ते शक्ती केंद्र : संघटन मजबुतीचा पाया- आमदार किशोर जोरगेवार.

भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर कार्यालयात बैठक संपन्न.

शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो आपल्या स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने हा उत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा. तसेच ‘मन की बात’ आणि ‘मुख्यमंत्री संवाद’ यांसारख्या कार्यक्रमांद्वारे शासनाच्या योजना व धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. बूथ ते शक्ती केंद्र हाच संघटन मजबुतीचा पाया असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर यांच्या वतीने बुधवार दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर महानगर जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शिवजयंती महोत्सव साजरा करण्याबाबत नियोजन, ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन, ‘मुख्यमंत्री संवाद’ कार्यक्रमाची तयारी तसेच विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संबोधित करतांना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रवि गुरुनुले, राज्य कार्यकारी परिषद सदस्य तुषार सोम, मनपा गट नेते चंद्रशेखर शेट्टी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राधुवीर अहिर, महामंत्री नामदेव डाहुले, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, ज्येष्ठ नेते प्रकाश देवतळे, बलराम डोडाणी, अरुण तिखे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, अॅड सारिका संदुरकर, प्रदिप किरमे, विनोद खेवले, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, नगर सेविका सरला कुळसंगे, सतिश तायडे, शितल गुरनुले, नगर सेवक जितेश कुळमेथे, आशा देशमूख, नितेश गवळी, ज्योती जिवने, दिवावकर पुट्टडवार, दिनकर सोमलकर, सायली येरणे, सतिश तायडे आदिंची प्रामख्यतेने उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शक्ती केंद्र आणि बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे. आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपण सर्वजण संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून आपल्या प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आहे. हा उत्सव प्रत्येक प्रभागात उत्साह, शिस्त आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग यांसह साजरा झाला पाहिजे.‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नागरिकांशी थेट संवाद साधतात. हा कार्यक्रम प्रत्येक बूथ स्तरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री संवाद’ कार्यक्रमाद्वारे राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविले गेले पाहिजेत. शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून आपण काम केले पाहिजे.
संघटनात्मक दृष्ट्या प्रत्येक शक्ती केंद्र आणि बूथ हा पक्षाचा कणा आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणुकीत यश निश्चित असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या जबाबदार्या गांभीर्याने पार पाडाव्यात. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. या बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

The Patil News