आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेतून केलेल्या मागणीला यश.
१५० कोटींच्या प्रकल्पातून विदर्भातील वनसंपदा, संशोधन व पर्यटनाला मिळणार चालना.
मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेतून बल्लारपूर शहरात टिंबर म्युझियम व झायलरियम उभारण्यासाठी आग्रही मागणी केली. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि विपुल वनसंपदेमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या बल्लारपूर शहरात १५० कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारण्याची गरज आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली आणि सभागृहात मागणी लावून धरली. यानंतर हा प्रकल्प नक्कीच साकारला जाईल, येत्या अर्थसंकल्पात ही मागणी पूर्ण होईल, अशी स्पष्ट आणि सकारात्मक घोषणा वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी केली.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेद्वारे बल्लारपूरच्या सागवान लाकडाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत ही मागणी लावून धरली होती. आ. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बल्लारपूरच्या सागवान लाकडाचा उपयोग अयोध्येतील श्रीराम मंदिर, संसद भवन, भारत मंडपम तसेच मा. पंतप्रधानांच्या कार्यालयातील फर्निचरमध्ये झाल्याचे नमूद करत महाराष्ट्राचा अभिमान अधोरेखित केला. तसेच जगातील प्रगत देशांमध्ये लाकूड संशोधन संस्थांची उभारणी झाल्याचे उदाहरण देत, बल्लारपूर येथेही अशाच दर्जाचे ज्ञानकेंद्र उभारण्याची गरज त्यांनी मांडली.
या प्रस्तावित प्रकल्पासाठी बल्लारपूर येथे सुमारे ६५ हेक्टर जागा उपलब्ध असून, ‘राम-लक्ष्मण’ नावाने ओळखले जाणारे ऐतिहासिक लाकूड, भामरागड परिसरातील जीवाश्म, लाकडाच्या ३२ दुर्मिळ प्रजाती, तसेच वनसंवर्धन, हवामान बदल आणि पर्यावरण शिक्षण यासंदर्भातील माहितीचे जतन, या म्युझियममध्ये करण्यात येईल.
बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या टिंबर म्युझियम व झायलरियममुळे या परिसराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळणार आहे. सागवान परंपरेचा ठेवा, राम-लक्ष्मण लाकूड, ऐतिहासिक संदर्भांचे जतन आणि वैज्ञानिक पद्धतीने मांडणी, यामुळे हे ठिकाण अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील एकमेव टिंबर म्युझियम म्हणून बल्लारपूर राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उभे राहील. त्यामुळे देश-विदेशातून पर्यटकांची वाढ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
यासोबतच, या म्युझियममुळे संशोधन, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. लाकूडशास्त्र, वनसंवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, तर








