The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो”  या ओळींची प्रचिती देणारा मोदी सरकारचा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प.

News Image

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया.

विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली केंद्रीय वित्तमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा नवभारताच्या आत्मविश्वासाचा, आर्थिक स्थैर्याचा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा आहे.“बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” या राष्ट्रभावनेची ठळक प्रचिती देणारा हा अर्थसंकल्प असून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रस्थानावर नेण्याचा दृढ संकल्प त्यातून दिसून येतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक आणि देशाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत संतुलित आणि भविष्याभिमुख तरतुदी करण्यात आल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला जी भक्कम पायाभरणी दिली आहे, त्याचाच पुढचा निर्णायक टप्पा हा अर्थसंकल्प आहे.

पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूकीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, लॉजिस्टिक्स व शहरी पायाभूत सुविधा यासाठी भरीव तरतुदी करून रोजगारनिर्मितीला गती देण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आला आहे. ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा हा कणा ठरणार आहे.

कृषी व ग्रामीण विकास या क्षेत्रात देखील भरीव तरतुदी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सिंचन सुविधा, कृषी प्रक्रिया उद्योग, साठवण क्षमता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेल्या तरतुदी शेतकरीहिताचे ठोस प्रतिबिंब आहेत.

महिलांसाठी विशेष योजना, स्वयंरोजगार, बचत गट, स्टार्टअप्स आणि आर्थिक समावेशनासाठी दिलेले प्रोत्साहन हे ‘नारीशक्ती’ला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारे पाऊल आहे.

युवक, शिक्षण व कौशल्य विकास यावर देखील भर देण्यात आला आहे. नवीन कौशल्ये, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण, स्टार्टअप्स, संशोधन व नवोन्मेषाला चालना देणाऱ्या तरतुदी भारताच्या युवा शक्तीला जागतिक स्तरावर सक्षम करतील.

उद्योग, स्टार्टअप्स व MSME क्षेत्राला देखील बळकटी देण्याचा प्रयत्न वित्त मंत्र्यांनी केला आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सुलभ कर्ज, भांडवल उपलब्धता आणि उद्योगस्नेही धोरणे ही ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी आहेत.

संरक्षण, तंत्रज्ञान व नवोन्मेष याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ, सामाजिकदृष्ट्या समतोल आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. केंद्रीय वित्त मंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, जबाबदार आणि दूरगामी परिणाम करणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी नसून, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आत्मविश्वासपूर्ण संकल्प आहे.

मोदी सरकारच्या या विकासाभिमुख वाटचालीला देशवासीयांचा विश्वास आणि पाठिंबा निश्चितच मिळत राहील, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.