Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी; महानगरपालिकेकडे निवेदन सादर.

चंद्रपूर, 19 जून 2026 : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील वडगाव येथील अपेक्षा नगर परिसरातील 30 रहिवाशांनी त्यांच्या घरांवर मालमत्ता कर लावण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. परिसरातील अनेक कुटुंबे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून वास्तव्यास असूनही त्यांच्या घरांवर अद्याप मालमत्ता कर लावण्यात आलेला नसल्याची बाब त्यांनी निवेदनातून मांडली आहे.
निवेदनानुसार, मालमत्ता कर नसल्यामुळे विविध शासकीय योजना तसेच मूलभूत सुविधांचा लाभ घेण्यात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील रहिवाशांकडे वीज बिल, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, त्यावरून त्यांचे दीर्घकालीन वास्तव्य स्पष्ट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने परिसराची पाहणी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घरांवर तातडीने मालमत्ता कर लागू करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल तसेच नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भातील निवेदन महानगरपालिका आयुक्तांना सादर करण्यात आले असून, त्याच्या प्रती महापौर व उपमहापौर यांनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा,(अपेक्षा नगरातील )नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: