The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या  निधनाने कला  विश्वाची मोठी हानी.

News Image

अभिनयाचा बुलंद आवाज आणि संवेदनशील माणूस  हरपला.

चंद्रपूर : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि आपल्या दमदार  अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट छाप सोडणारे नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोवा येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलगा मल्हार पाटेकर यांनीही पुष्टी केली आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयातून  विविध भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप निर्माण केली. ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’  यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या आवाजातील ठामपणा, संवादफेक आणि अभिनयातील वास्तववाद ही त्यांची स्वतंत्र ओळख होती.

चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच सामाजिक संवेदनशीलतेसाठीही नाना पाटेकर ओळखले जात होते. समाजातील वंचित, शेतकरी आणि गरजू घटकांविषयी त्यांनी वेळोवेळी आपली  भूमिका मांडली.

नाना पाटेकर यांचे निधन ही केवळ मराठी  आणि हिंदी चित्रपटसृष्टीचीच नव्हे, तर भारतीय कला क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.

नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण  श्रद्धांजली!

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि  त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना  हे   दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

 

              — भावपूर्ण श्रद्धांजली

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पिर्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग.🔔अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अभिनयविश्वातील एक अजरामर पर्व हरपले-आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या  निधनाने कला  विश्वाची मोठी हानी.🔔चंद्रपूर जिल्ह्यात हजारो बांधकाम मजूर योजनांपासून वंचित; १ ते १.५ वर्षांपासून नूतनीकरण रखडले.🔔CTPS मध्ये 80% रोजगाराचा स्थानिकांना हक्क द्या!🔔वाढोणा येथे 103 सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार.🔔191 आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी.🔔उपजीविका संसाधन केंद्रातून दुर्गम भागात आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा.