Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभर संपर्क दौरा; चिमूरपासून बल्लारपूरपर्यंत पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठका.
चंद्रपूर, ता. ८ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात विविध तालुक्यांचा दौरा करीत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदारांशी संवाद साधला. चिमूरपासून सुरू झालेला हा दौरा नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, चंद्रपूर शहर असा करीत सायंकाळी बल्लारपूर येथे पदवीधर मतदारसंघ आढावा बैठकीने पूर्ण झाला.

यावेळी विविध ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविण्यावर तसेच स्थानिक प्रश्न समजून घेण्यावर भर देण्यात आला.
युवांच्या रोजगाराचा मुद्दा मांडताना ॲड. वंजारी यांनी शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे हे आजच्या तरुणांसमोरील महत्त्वाचे आव्हान असून, शिक्षण, कौशल्यविकास, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भूमिका मांडली. पदवीधर तरुणांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या रोजगार व व्यावसायिक संधींच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

चिमूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद.
चिमूर येथील बालाजी मंदिर सभागृहात झाली. चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहसचिव प्रा. राम राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अतकरे, काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते किशोरबाबू शिंगरे, जुनेद खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागभीडमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग.
नागभीड येथील रुक्मिणी सभागृहात बैठक झाली. यावेळी नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे धनराज मुंगले, जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष फत्तुजी खापर्डे, काँग्रेस कमिटीचे माजी सचिव डॉ. मोहनजी जगनाडे, काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्रजी कावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ब्रह्मपुरीतही बैठक.
ब्रह्मपुरी येथील आरमोरी मार्गावरील झाडे मीटिंग हॉलमध्ये बैठक झाली. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष बाळूभाऊ राऊत, माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, प्राचार्य डॉ. रमेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंदेवाही, सावलीतही बैठका.
सिंदेवाही येथील श्रवण हॉलमध्ये बैठक झाली. तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, सागर गेडाम, महेंद्र आत्राम, मंगेश मेश्राम, जानकीराम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर दुपारी १.३० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे बैठक झाली. तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, प्राचार्य आर.एम.जी.एम. कॉलेजचे चंद्रमौली, नगराध्यक्षा साधनाताई वाढई, नगरपरिषद बांधकाम सभापती नितेश रस्से, पंचायत समितीचे माजी सभापती विजयभाऊ कोरेवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मूल, चंद्रपूरनंतर बल्लारपूरमध्ये आढावा बैठक.
मूल येथील काँग्रेस भवनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर चंद्रपूर शहरातही त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
दौऱ्याचा समारोप बल्लारपूर येथील कबीर सेलिब्रेशन येथे आयोजित पदवीधर मतदारसंघ आढावा बैठकीने झाला. दिवसभरातील विविध बैठकींमध्ये पदवीधर मतदारांशी संपर्क, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: