Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर : चंद्रपूरच्या विधी क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेले प्रशांत छगनलाल खजांची यांना त्यांच्या प्रदीर्घ विधी सेवेसह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘विधी भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन माता महाकालीची मूर्ती देत मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, भाजप नेते प्रकाश देवतळे यांची उपस्थिती होती.
प्रशांतजी छगनलाल खजांची यांनी वकिली क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ आपली सेवा दिली आहे. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी विधी क्षेत्रातील अनुभव, अभ्यास आणि कार्यतत्परतेच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. न्यायव्यवस्थेशी संबंधित विविध बाबींमध्ये त्यांनी दिलेले योगदान तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांची उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांच्या या दीर्घकालीन कार्याची दखल घेत त्यांना ‘विधी भूषण पुरस्कार’ जाहीर होणे ही चंद्रपूरसाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी खजांची यांच्या विधी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवेतून त्यांनी विधी क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांचा हा सन्मान नव्या पिढीतील विधिज्ञांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रपूरच्या विधी क्षेत्रातील एका अनुभवी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: