The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पोंभुर्णा ITI मध्ये २५ हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला पकडले; प्राचार्यही ACBच्या ताब्यात!

News Image

३० हजारांची मागणी; तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

चंद्रपूर : पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी सापळा कारवाई केली. या कारवाईत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक नरेंद्र चंद्रशेखर मलिक (वय ४७) यांना पकडण्यात आले, तर संस्थेच्या प्राचार्य कल्पना संजय खोब्रागडे (वय ५५) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

तक्रारीचा तपशील :

या प्रकरणातील तक्रारदार महिला (वय ३१) या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोंभुर्णा येथे तासिका तत्त्वावर शिल्प निदेशक म्हणून कार्यरत असून वायरमन विषयाचे सैद्धांतिक (थिअरी) व प्रात्यक्षिक अध्यापन करीत होत्या. सैद्धांतिक अध्यापनासाठी प्रतितास २७० रुपये, तर प्रात्यक्षिकासाठी प्रतितास २७५ रुपये मानधन मिळत होते.

मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ या पाच महिन्यांचे एकत्रित मानधन नोव्हेंबर २०२६ मध्ये मिळाले होते. हे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात प्राचार्य कल्पना संजय खोब्रागडे यांनी लिपिक नरेंद्र चंद्रशेखर मलिक यांच्यामार्फत ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची लेखी तक्रार २१ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे देण्यात आली.

तक्रारीची पडताळणी :

२२ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी तक्रारदाराचे पाच महिन्यांचे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तसेच लिपिक नरेंद्र मलिक यांनीही प्राचार्यांच्या मागणीला प्रोत्साहन देऊन लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

सापळा कारवाई :

२३ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. यावेळी प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांच्या मागणीनुसार कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राचार्य कल्पना संजय खोब्रागडे आणि कनिष्ठ लिपिक नरेंद्र चंद्रशेखर मलिक या दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस स्टेशन, जिल्हा चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कारवाई करणारे अधिकारी :

  • सापळा अधिकारी : श्री. तेजराम मेघशाम, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर.

  • पर्यवेक्षक अधिकारी : श्री. अनिल जिट्टुवार, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर.

The Patil News | चंद्रपूर


टीप : सदर बातमी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाच्या आधारे प्रकाशित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. संबंधित व्यक्तींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी मानता येणार नाही. अंतिम निर्णय न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार होईल.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत खजांची यांना ‘विधी भूषण पुरस्कार’, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेऊन केले अभिनंदन.🔔पोंभुर्णा ITI मध्ये २५ हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला पकडले; प्राचार्यही ACBच्या ताब्यात!🔔जिल्ह्यात 243 वनराई बंधा-यांची निर्मिती.🔔राजुरा येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.🔔चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई; ५७ जनावरांची सुटका.🔔प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी.🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.