The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्ह्यात 243 वनराई बंधा-यांची निर्मिती.

News Image

53.46 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा संरक्षित.

चंद्रपूर : दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने लघु पाटबंधारे उपविभाग, संबंधित ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून जिल्ह्यात नाले व नैसर्गिक जलप्रवाहांवर एकूण 243 वनराई बंधा-यांची निर्मिती करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यात 53.46 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा संरक्षित करण्यास मदत झाली आहे.

पावसाळ्यानंतर उपलब्ध पाणी अधिकाधिक काळ साठवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत वाहून जाणारे पाणी अडविणे, स्थानिक पातळीवर जलसाठा निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरणास मदत होण्यासाठी 15 तालुक्यात वनराई बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले. आतापर्यंत एकूण 243 वनराई बंधा-यांची कामे पूर्ण झाली आहेत.

यात वरोरा तालुक्यात 12 वनराई बंधारे (अडविलेला पाणीसाठा 2.64 स.घ.मी.), भद्रावती 17 वनराई बंधारे (पाणीसाठा 3.74 स.घ.मी.), राजुरा 13 वनराई बंधारे ( पाणीसाठा 2.86 स.घ.मी.), कोरपना 10 बंधारे (2.20 स.घ.मी.), जिवती 9 बंधारे (1.98 स.घ.मी.), नागभीड 45 बंधारे (9.90 स.घ.मी.), चिमूर 3 बंधारे (0.66 स.घ.मी.), मूल 5 बंधारे (1.10 स.घ.मी.), सावली 18 बंधारे (3.96 स.घ.मी.), गोंडपिपरी 5 बंधारे (1.10 स.घ.मी.), बल्लारपूर 5 बंधारे (1.10 स.घ.मी.), सिंदेवाही 61 बंधारे (13.42 स.घ.मी.), ब्रम्हपुरी 21 बंधारे (4.62 स.घ.मी.), पोंभुर्णा 16 बंधारे (3.52 स.घ.मी.) आणि चंद्रपूर तालुक्यात 3 वनराई बंधारे (अडविलेला पाणीसाठा 0.66 स.घ.मी.), असे एकूण 243 बंधा-यातून 53.46 सहस्त्र घनमीटर पाणीसाठी अडविण्यात आला आहे.

सोबतच लघु पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी आवश्यक ठिकाणी पाट्या (गेट) बसविण्याची कामे उपविभागांमार्फत सुरू करण्यात आली आहेत. तसेच सिमेंट प्लग बंधारे, माजी मालगुजारी तलाव, लघु पाटबंधारे तलाव आणि साठवण तलावांमधील उपलब्ध पाण्याचे संरक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप खंबाईत यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔जिल्ह्यात 243 वनराई बंधा-यांची निर्मिती.🔔राजुरा येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.🔔चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई; ५७ जनावरांची सुटका.🔔प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी.🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.🔔जिल्ह्यात बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम राबवा.🔔दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके.