The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

राजुरा येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

News Image

CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास; तीन आरोपी ताब्यात, एक फरार.

चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने उलगडा केला आहे. गोपनीय माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीचे दागिने विक्रीसाठी स्वीकारणारा एक आरोपी फरार आहे.

राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७९०/२०२६, कलम ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. गोपनीय माहिती आणि परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

या तपासादरम्यान मुख्य आरोपी अतुल विकास राणा (वय २६, रा. चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच चोरीचे दागिने विक्री करण्यास मदत करणारे दानिश जलील सय्यद (वय २४) आणि हर्ष उमेश मिश्रा (वय २३), दोघेही रा. वर्धा, यांना वर्धा येथून ताब्यात घेण्यात आले.

चोरीचे दागिने विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न; एक आरोपी फरार.

तपासादरम्यान चोरीचे दागिने मयूर शर्मा (वय ३०, रा. वर्धा) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, मयूर शर्मा हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील तिन्ही ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी राजुरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपींची नावे :

१. अतुल विकास राणा (वय २६), रा. चंद्रपूर.

२. दानिश जलील सय्यद (वय २४), रा. वर्धा.

३. हर्ष उमेश मिश्रा (वय २३), रा. वर्धा.

फरार आरोपी : मयूर शर्मा (वय ३०), रा. वर्धा.

कारवाई पथक : उपविभाग चंद्रपूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔जिल्ह्यात 243 वनराई बंधा-यांची निर्मिती.🔔राजुरा येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.🔔चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई; ५७ जनावरांची सुटका.🔔प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी.🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.🔔जिल्ह्यात बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम राबवा.🔔दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके.