The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई; ५७ जनावरांची सुटका.

News Image

९ जनावरांचा मृत्यू; ४८ जनावरे सुखरूप, ३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत.

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कारवाई करत ५७ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत १८ चाकी ट्रेलर ट्रकसह एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजयपूर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी १८ चाकी ट्रेलर ट्रकमधून गोवंशीय जनावरांची अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूर पद्धतीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. जनावरांना आखूड दोराने बांधण्यात आले होते. तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

या वाहतुकीदरम्यान ९ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर उर्वरित ४८ जनावरांची पोलिसांनी सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील उपचार, चारा-पाणी आणि देखभालीसाठी तातडीने प्यार फाउंडेशन, पडोली येथे दाखल करण्यात आले आहे.

एक आरोपी अटकेत, तिघे फरार

या प्रकरणात पोलिसांनी नईमुद्दीन करिमद्दीन शेख (वय ४०, रा. घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर) याला अटक केली आहे. तर इम्रान शेख, इर्शाद खान आणि मोहम्मद साकिब मोहम्मद शकूर (तिघेही रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) हे आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे.

  • ट्रेलर ट्रक – ३० लाख रुपये

  • ५७ गोवंशीय जनावरे – ५ लाख ७० हजार रुपये

  • मोबाईल फोन – १० हजार रुपये

एकूण जप्त मुद्देमाल – ३५ लाख ८० हजार रुपये.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारित) २०१५ तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

कारवाई पथक : ब्रह्मपुरी उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔जिल्ह्यात 243 वनराई बंधा-यांची निर्मिती.🔔राजुरा येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.🔔चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर पोलिसांची कारवाई; ५७ जनावरांची सुटका.🔔प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी.🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.🔔जिल्ह्यात बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम राबवा.🔔दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके.