The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

निवृत्तीवेतनधारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र.

News Image

1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम.

चंद्रपूर, : राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन नियमितपणे मिळत राहावे, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ प्रणालीद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडिशालवार आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘जीवन प्रमाण’ या डिजिटल प्रणालीमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या प्रणालीद्वारे आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईलवरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून सादर करता येते. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना बँक अथवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. या सुविधेमुळे विशेषतः वृद्ध, दिव्यांग तसेच प्रवास करण्यास अडचण असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक माहिती सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन नोव्हेंबर महिन्यात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे, जेणेकरून निवृत्तीवेतनाचे नियमित प्रदान सुरू राहील, असे प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडिशालवार यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पशुधनाला जिवंत ठेवण्यासाठी पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - पालकमंत्री डॉ.अशोक उईके.🔔अंतर्गत समिती' स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर 50 हजारांपर्यंत दंड.🔔जिल्ह्यात बालकामगारविरोधी धाडसत्र मोहीम राबवा.🔔दुष्काळी परिस्थितीवर एकजुटीने मात करू या! – पालकमंत्री डॉ. उईके.🔔संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करा. – जिल्हाधिकारी वसुमना पंत.🔔भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ.🔔निवृत्तीवेतनधारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र.🔔पतसंस्थेबाबत काही हरकती असल्यास 12 नोव्हेंबरपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन.