Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 04 : खरीप हंगाम 2026-27 मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. धान/भात साधारण एफ.ए.क्यू प्रति क्विंटल 2441 रुपये असून शासनाने दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यू दर्जाचा शेतमाल खरेदी करण्यात येणार आहे. धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली शासनाच्या बीम पोर्टलवर आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून बायोमेट्रिक पध्दतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी स्वत:हजर राहणे आवश्यक आहे.
चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार लिंक मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, बॅक पासबुक, खरीप हंगाम 2026-27 धान पीक पेरासह 7/12 उतारा, 7/12 उतारा सामाईक असल्यास हिस्सेदाराचे आधार कार्डवर सह्या व त्यांचे संमतीपत्र या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समिती कडून करण्यात येत आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: