Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 03 : 4 सप्टेंबर 2026 रोजी फिर्यादी अनिल मुलचंद बंजार (वय 30 वर्ष) रा. महेशनगर तुकुम यांना एक अनोळखी इसम रेल्वे पटरीजवळ मृतावस्थेत आढळला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर मृतक हा अंदाजे 40 ते 50 वर्ष वयाचा असावा. त्याचा वर्ण-सावळा, उंची 5 फुट 2 इंच, बांधा-सरपातळ, अंगात लाईट ग्रे कलरची टी शर्ट व राखाडी रंगाचा पॅन्ट घातलेला, मरण पावलेल्या व कुजलेल्या अवस्थेत मिळाला असून वरील वर्णनाचे अनोळखी मृतकाबाबत काही माहिती असल्यास पो. स्टे. दुर्गापुर (फोन नं. 07172-265630) येथे सहायक फौजदार अंकुश आत्राम (मो. 8007702078) यांच्याशी संपर्क करावा, असे तपासी अंमलदार, दुर्गापूर पोलिस स्टेशन यांनी कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: