Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
4 प्राथमिक केंद्रातील 200 जणांचा सहभाग.
चंद्रपूर, दि. 03 : ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया फाउंडेशन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मिशन आनंदी (असंसर्गजन्य आजार कार्यक्रम) अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणात जवळपास 200 आशा वर्कर व गटप्रवर्तक सहभागी झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी पुंडलिक पाल, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. खामनकर, तालुका समूह संघटक आर. के. राठोड, समुदाय संघटन व आरोग्य तज्ज्ञ संदेश समुद्रे, जिल्हा असंसर्गजन्य रोग समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर, जिल्हा कार्यक्रम प्रमुख अजय बोमकर, आरोग्य नियोजक अन्नपूर्णा निषाद, रवींद्र अहिर यांच्यासह आरोग्य विभाग व मिशन आनंदीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशिक्षणात उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच स्तन, गर्भाशयमुख व मुखाच्या कर्करोगाची लक्षणे, लवकर ओळख, तपासणी व संदर्भसेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावपातळीवर रक्तदाब व रक्तशर्करा तपासणीचा नियमित पाठपुरावा करणे, 30 वर्षांवरील महिलांना स्तन स्वयंपरीक्षणाचे मार्गदर्शन करणे, तंबाखू/गुटखा सेवनकर्त्यांची मुखतपासणी व व्यसनमुक्ती समुपदेशन करणे आणि उच्च जोखमीच्या रुग्णांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित करणे यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणापूर्वी व नंतर परीक्षा घेऊन सहभागीच्या ज्ञानवाढीचे मूल्यमापन करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर यांनी कळविले आहे.
दुर्गापूर येथे स्तन कर्करोग जनजागृती कार्यक्रम : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जनजागृती महिना साजरा केला जातो. यानिमित्ताने 27 ऑक्टोबर रोजी मिशन आनंदी प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत दुर्गापूर येथे स्तन कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात महिलांना स्तन कर्करोगाची लक्षणे, वेळेवर तपासणी, लवकर निदान आणि योग्य उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला समुदाय संघटन व स्वास्थ्य धोरण तज्ज्ञ डॉ. संदेश समुद्रे, जिल्हा समन्वयक डॉ.पद्मजा बोरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बढे आणि जिल्हा प्रकल्प अँकर अजय बोंबेकर, मिशन आनंदी प्रकल्पाचे हेल्थ प्लेनर रवींद्र अहिरे उपस्थित होते.
यावेळी महिलांना स्तनांमध्ये कोणताही असामान्य बदल जाणवल्यास दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले. स्तनांची नियमित तपासणी, वेळेवर निदान आणि योग्य उपचार यांचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: