चंद्रपूर : देशाच्या सन्माननीय महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या चंद्रपूरच्या उज्वला सोयाम यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्ण सेवा करणाऱ्या उज्वला सोयाम यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांनी आपल्या कार्यातून चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर गौरवान्वित केले असल्याची भावना व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला सन्मान हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.आरोग्य क्षेत्रात सातत्याने केलेल्या उलेखनीय कार्यामुळेच त्यांना हा बहुमान प्राप्त झाला असून त्यांच्या कार्यातून समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित उज्वला सोयाम यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत केला सत्कार.













