Advertisement

शिवसेना शिंदेगटाला राजुरा-वणी-आर्णी साठी नवा सोशल मिडिया प्रमुख.

सुयोगजी अवथरे यांची लोकसभा प्रमुख पदी नियुक्ती – कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.

चंद्रपूर, : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोशल मिडिया चंद्रपूर लोकसभा क्षेत्र व चंद्रपूर जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी सुयोगजी अवथरे यांची शिवसेना सहकार सेना  जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाली होती. परंतु काही कारणास्तव ती नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना लोकसभा प्रमुख (राजुरा, वणी, आर्णी) या मोठ्या जबाबदारीवर नियुक्ती दिली आहे.

पूर्व विदर्भ सोशल मिडिया प्रमुख श्री. योगेश अनिल पोनिकर यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सुयोगजी अवथरे म्हणाले, “पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहीन. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि राजुरा, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्रात पक्षाचा प्रचार वाढवण्यासाठी काम करेन.”

या नियुक्तीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून सुयोगजी अवथरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.