Advertisement

17 जून पासून बेपत्ता असलेल्या श्री. गणेशराव उर्फ सुरेंद्र चंपतराव कडुकर यांचा अजूनही शोध सुरूच.

बुधवार दिनांक १७ जून २०२६, सकाळी ७.३० वाजता ची वेळ नेहमी प्रमाणे कामासाठी सायकल ने श्री. गणेशराव उर्फ सुरेंद्र चंपतराव कडुकर (वय ५९ वर्ष. रा. श्रीनगर वॉर्ड लालपेठ कॉलरी नं.3, चंद्रपूर) घरून निघाले आणि बऱ्याचदा मोबाईल घरी विसरण्याच्या सवयी मुळे आजही मोबाईल घरीच विसरून दुकानात गेले असावे असा अंदाज त्यांच्या पत्नीने (सौ. वंदना सुरेंद्र कडुकर) बांधला तर दुपारच्या सुमारास गणेशराव घरी विसरलेल्या मोबाईलवर ते कामाला जात असलेल्या दुकानातल्या सहकाऱ्याच्या आलेल्या कॉल मुळे त्यांच्या पत्नीला कळते की गणेशराव आज दुकानात गेलेच नाही आणि त्या घरी असलेल्या मोबाईल मधून रिसेंट कॉल मध्ये असलेल्या गणेशरावांच्या मित्राला कॉल करून चौकशी करतात तेव्हा तो मित्र ‘काकाजी आज (१७ जून) सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान माझ्या दुकानात (हेअर सलून, गंजवार्ड) आले होते आणि बसने मार्कंडा (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथे जात आहे तर आणखी २-३ लोक सोबत आहे’ असे त्या मित्राने सांगितले. पत्नीला मिळालेल्या माहितीनुसार गणेशराव रात्री पर्यंत परत येतील अशा त्या आश्वस्त झाल्या परंतु १७ जून ची रात्र संपता संपता त्यांची चिंता ही वाढत होती वाट बघत १८ जून उजाडला आणि तेव्हा पासून त्यांचे सगळे मित्र, नातेवाईक, मार्कंडा, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, दवाखाने अशा विविध ठिकाणी शोध सुरू झाला आणि आता बातमी लिहत पर्यंत देखील गणेशरावांचा शोध हा सुरूच आहे.

शारीरिक वर्णन – वय ५९, उंची ५.७ फूट, रंग गव्हाळ, चष्मा, पांढरे केस, पांढरा शर्ट, निळा फुल पॅट, काळी चप्पल, गळ्यात पांढरा दुपट्टा, काळी उंच लेडीज सायकल आणि सायकलला लाल पिशवी.

संभावित ठिकाण – गणेशराव देव पूजेत जास्त रमत असल्या मुळे त्यांच्या कुटुंबीयांना ते कोणत्या धार्मिक स्थळी किंवा कोणत्या तरी वारीत असावे असे वाटत आहे.

तरी सदर व्यक्ती आपणास आढळल्यास आधी खात्री करून संपर्क करावा.

संपर्क – निखिल वंदना सुरेंद्र कडुकर
9604463157, 9156190274