Advertisement

पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.

शाळापूर्व मेळावा व आयडियल सेंटर (कॉम्प्युटर लॅब) आणि ग्रंथालयाचे उद्घाटन.

चंद्रपूर, दि. ३० जून : पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळा, मनपा चंद्रपूर येथे प्रवेशोत्सव, शाळापूर्व मेळावा क्र. २ तसेच पीएम श्री योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटर (कॉम्प्युटर लॅब) व ग्रंथालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री संदीप चिद्रवार (उपायुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका), मा. आशिष सर (अभियंता, चंशमनपा), मा. वसंताभाऊ देशमुख (नगरसेवक), मा. श्री जितुभाऊ मशारकार (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा. सौ. वैशालीताई चंदनखेडे (सभापती, झोन क्र. २ तथा नगरसेविका) यांनी उपस्थिती लावली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई जांभुळकर, समिती सदस्य, मुख्याध्यापिका सौ. परिणय वासेकर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील ढोल-लेझीम पथकाने मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मुख्याध्यापिका सौ. परिणय वासेकर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे मा. श्री संदीप चिद्रवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित अभ्यास, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगला नागरिक बनण्याचे महत्त्व सांगितले. अध्यक्षा सौ. वैशालीताई चंदनखेडे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यानंतर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना दप्तर, पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटर (कॉम्प्युटर लॅब) व ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार वाचन संस्कृतीचा लाभ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी शाळापूर्व मेळावा क्र. २ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व कृतीप्रधान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन पोटे यांनी केले, तर श्री. अनिल वीर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रवेशोत्सव, आधुनिक शैक्षणिक सुविधांचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि उपस्थित मान्यवरांसाठी संस्मरणीय ठरला.

                      जितेंद्र रामचंद्र मशारकर 

रा. फ्लॅट न. १०४ सफरोनी अपार्टमेन्ट, सिव्हिल लाईन चंद्रपूर.

      Cont :  9325242852, 9552550315

      jitumasharkar@gmail.com

      http://jitumasharkar.blogspot.in/