Advertisement

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे अधिकृत गटनेते म्हणून सुरेंद्र अडबाले यांचा पदग्रहण सोहळा संपन्न.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत गटनेते म्हणून श्री. सुरेंद्र अडबाले यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित पदग्रहण सोहळ्यास विविध मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. सुरेंद्र अडबाले यांचे अभिनंदन करून त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. ही जबाबदारी केवळ पदापुरती मर्यादित नसून, चंद्रपूरकरांच्या प्रश्नांना महानगरपालिका सभागृहात प्रभावीपणे मांडत लोकहितासाठी कार्य करण्याची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

तसेच, श्री. सुरेंद्र अडबाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस यश लाभावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

– THE PATIL NEWS | डिजिटल डेस्क