बामणी टर्निंग येथे वारंवार होत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अमिश मेश्राम व सुमित गोरघाटे यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात बामणी टर्निंग येथे वाहतूक पोलीस नियुक्त करणे, अपघातप्रवण ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स उभारणे, वेगमर्यादा व धोकादायक वळणाचे सूचना फलक बसविणे, रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे तसेच स्पीड ब्रेकर व रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या उपाययोजना तातडीने राबविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांच्या जीविताचे संरक्षण होईल, असा विश्वास अमिश मेश्राम व सुमित गोरघाटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रशासनाने या मागण्यांची त्वरित दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.













