The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प.

News Image

जल सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती.

शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या सहभागातून प्रभावी जलव्यवस्थापन.

चंद्रपूर, दि. 09 : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलसंपत्तीचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, यांच्या वतीने 2 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ‘जल सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, पाणी वापर संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून जलव्यवस्थापन, पाणी बचत, सिंचन व्यवस्थेची देखभाल तसेच जलसंपत्तीच्या कार्यक्षम वापरासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळणे, शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पाण्याचा वापर करणे, अनावश्यक पाणी सोडणे तसेच सिंचनाच्या वेळापत्रकाचे पालन करण्यासाठी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे न्याय्य व कार्यक्षम वितरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या कार्यक्षेत्रातील धरणे, कालवे आणि सिंचन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. कालव्यांमधील पाणीगळती, पाण्याचा अपव्यय होणारी ठिकाणे, दुरुस्तीची आवश्यकता असलेली कामे तसेच पाणी वितरणातील अडथळे यांची नोंद घेण्यात येईल.

सिंचन व्यवस्थेतील शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. पाणी वितरणातील अडचणी, पाणीपट्टीच्या देयकांबाबतच्या तक्रारी तसेच सिंचनाशी संबंधित इतर समस्या जाणून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. अभियानाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तसेच भूसंपादन प्रकरणांचा आढावा घेऊन त्यांचा जलदगतीने निपटारा करण्यात येणार आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. घरगुती वापर, शेती आणि इतर आवश्यक कामांसाठी पाण्याचा वापर गरजेनुसार करावा. पाण्याची गळती आढळल्यास संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करावे, तर पाणी वापर संस्थांनी पाणी वितरणात समन्वय राखावा. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश प्रत्येक शेतकरी व नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंह यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.🔔15 ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन.🔔चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप.🔔महसूल लोक अदालतीत  16 प्रकरणे निकाली.🔔दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प.🔔ज्ञानासाठी गुंतवणूक हाच आपला विकासमंत्र : ॲड. अभिजित वंजारी.