Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
शिबिर व ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषद.
नवउद्योजक व लघुउद्योगांना मिळणार निर्यातविषयक मार्गदर्शन.
चंद्रपूर, दि. 08 : जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘डिस्ट्रिक्ट्स ॲज एक्सपोर्ट हब्स’ उपक्रमांतर्गत 13 ऑक्टोबर 2026 रोजी चंद्रपूर येथे ‘निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
विदेश व्यापार महासंचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत केंद्र शासनाच्या निर्यात प्रोत्साहन मोहिमे अंतर्गत उपलब्ध विविध योजना, मुक्त व्यापार करार, निर्यात प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी तसेच ई-कॉमर्सच्या माध्यमातून उत्पादनांची निर्यात करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विशेषतः जिल्ह्यातील नवउद्योजक, संभाव्य निर्यातदार तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, आर्थिक सहाय्य, निर्यात विमा, कर्ज सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी आणि ई-कॉमर्स आधारित निर्यात व्यवस्थेची माहिती या परिषदेत दिली जाणार आहे.
या कार्यक्रमात कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, निर्यात पत हमी महामंडळ, एक्झिम बँक, भारतीय लघुउद्योग विकास बँक, एमएसएमई तसेच डीएचएल आणि वॉलमार्ट यांसारख्या विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संस्थांच्या माध्यमातून निर्यात वित्तपुरवठा, विमा संरक्षण, मालवाहतूक, ई-कॉमर्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नव्या उद्योजकांना निर्यात क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, नवउद्योजक, संभाव्य निर्यातदार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांनी केले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: