The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

चंद्रपुरात महायुतीचे पदवीधर मतदार संमेलन; पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, उमेदवार सुधाकर कोहळे यांना समर्थनाचे आवाहन.

News Image

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर विधानसभेचे आयोजन.

चंद्रपूर : पदवीधरांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांना न्याय मिळवून देणे आणि शिक्षित युवकांसाठी रोजगारासह विविध संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पदवीधर मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पदवीधर मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, रविंद्र गुरूनुले, सविता दंढारे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, दशरथ सिंग ठाकूर, निलेश बेलखेडे, नगर सेवक जितेश कुळमेथे, आशा देशमुख, दत्तू गवळी, ज्योती जीवने, सुमित बेले यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार

पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पदवीधर हे समाजाच्या विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला अनुरूप रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा आणि व्यावसायिक प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांवर काम सुरू असून, पदवीधरांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जाव्यात, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आपल्या भाषणात पदवीधरांच्या प्रश्नांचे महत्त्व सांगितले, शिक्षित युवकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे, त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधरांच्या अपेक्षा आणि प्रश्न यांचा विचार करून विकासाभिमुख कामांना गती देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

महायुतीचे उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्या योग्य व्यासपीठावर मांडणे, रोजगार व शैक्षणिक संधींशी संबंधित प्रश्नांवर पाठपुरावा करणे आणि त्यांच्या अपेक्षांनुसार काम करण्यावर भर राहील, असे त्यांनी सांगितले.

पदवीधरांचा विश्वास संपादन करून त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी कार्यरत राहण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या मेळाव्यात पदवीधर मतदारांशी संवाद साधत त्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि त्यांच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना मतदान करण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपुरात महायुतीचे पदवीधर मतदार संमेलन; पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती, उमेदवार सुधाकर कोहळे यांना समर्थनाचे आवाहन.🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाच्या ध्वजारोहनाने महाकाली महोत्सवाचा शुभारंभ, मातेच्या चांदीच्या मूर्तीची निघाली पालखी .🔔पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध : ॲड. अभिजित वंजारी.🔔पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ‘एआय डिस्ट्रिक्ट हब’ स्थापन करणार!🔔चंद्रपूर जिल्ह्यातील 3410 शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त.🔔मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या पाच फरार आरोपींचा शोध सुरू.🔔धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल.🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.