Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
भद्रावती, राजुरा येथे आढावा बैठका; चंद्रपूर व गोंडपिपरीतही कार्यकर्त्यांशी संवाद.

चंद्रपूर, दि. १३ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात भद्रावती आणि राजुरा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका उत्साहात पार पडल्या. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्व घटकांनी एकजुटीने काम करणे आवश्यक असून, शिक्षक, कर्मचारी आणि पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर भर देण्यात आला. मतदारांशी थेट संपर्क वाढविणे, संघटनात्मक समन्वय मजबूत करणे आणि आगामी प्रचाराची दिशा निश्चित करणे, यावर बैठकीत चर्चा झाली.
भद्रावती येथे झालेल्या बैठकीला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अयतेश्याम श्याम अली, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष नरेश काळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे अध्यक्ष सिद्धार्थ सुमन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजुरा येथेही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सुधाकर अडबाले, सुभाष धोटे, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, विमाशि संघाचे कार्यवाह दीपक थोपटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस कमिटी कोरपनाचे अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्यात चंद्रपूर शहर आणि गोंडपिपरी येथेही कार्यकर्ते व पदवीधरांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करून पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचावे, संघटनात्मक ताकद वाढवावी आणि निवडणुकीच्या प्रचाराला गती द्यावी, यावर या दौऱ्यात भर देण्यात आला.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: