Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून दर सोमवारी विविध समाज व संस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून लालपेठ कॉलरी परिसरातील महाराष्ट्रातील पुरातन व विशाल महाशिवलिंग मंदिरात दर सोमवारी विविध समाज, समाजसेवी संस्था आणि धार्मिक संस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत यावेळी धनोजे कुणबी समाज, चंद्रपूर यांच्या वतीने भजन संध्या, अभिषेक, आरती आणि प्रसाद वितरण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी तसेच चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना केली. भजन संध्या आणि आरतीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
विशाल महाशिवलिंग मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे महत्त्वपूर्ण केंद्र असून, या ठिकाणी विविध समाज आणि संस्थांना धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दर सोमवारी आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे विविध समाजांना धार्मिक परंपरा जपण्यासोबतच सामूहिक भक्तीचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
या कार्यक्रमाचे यजमानपद धनोजे कुणबी समाज, चंद्रपूरचे अध्यक्ष श्रीधर मालेकर यांनी भूषविले. यावेळी विशाल महाशिवलिंग सेवा समिती, लालपेठ, चंद्रपूरचे पदाधिकारी, धनोजे कुणबी समाजाचे सदस्य, भाविक आणि आयोजक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: