The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता जमा.

News Image

जिल्ह्यातील 2 लक्ष 44 हजार 796 पात्र शेतक-यांना लाभ.

चंद्रपूर, दि. 30 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 44 हजार 796 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 24 व्या हप्त्याची रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथे आज (दि.30) ऑनलाइन समारंभाद्वारे देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात आले.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी 1 डिसेंबर 2018 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये याप्रमाणे वार्षिक 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 व्या हप्त्याचे वितरण 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

रक्कम जमा झालेल्या शेतक-यांची तालुकानिहाय संख्या : चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लक्ष 44 हजार 796 पात्र शेतक-यांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील 6527 पात्र लाभार्थी, बल्लारपूर तालुका (3906 लाभार्थी), मूल (17675), सावली (22027), वरोरा (22004), भद्रावती (12159), चिमूर (32176), नागभीड (23054), ब्रम्हपुरी (35143), सिंदेवाही (16628), राजुरा (12582), कोरपना (12169), जिवती (5318), गोंडपिपरी (13296), पोंभुर्णा (9759) व इतर 373 पात्र शेतक-यांचा समावेश आहे.

कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे आयोजन : भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम किसान) या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बारसकांटा, गुजरात येथून करण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य वितरित करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतक-यांना दुष्काळ परिस्थीतीमध्ये रब्बीचे व्यवस्थापन व चारा व्यवस्थापन कसे करावे, तसेच ई-केवायसी, आधार संलग्न बँक खाते, लाभार्थी स्थिती तपासणी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी व महिला शेतक-यांची उपस्थिती होती.

पंतप्रधानांचे दूरद्ष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन : शेतक-यांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज देशातील 9 कोटी 34 लक्ष शेतक-यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 18 हजार 690 कोटी रुपये जमा करण्यात येत आहे. शेतकरी हे विकसीत भारताच्या मजबूत स्तंभापैकी एक आहे. सरकारने शेतक-यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. सिंचनावर शेतक-यांचा खर्च कमी व्हावा, यासाठी सौर उर्जा कृषी पंपांना प्राधान्य देण्यात येत आहे. शेती ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी मधक्रांती, (शहद उत्पादन) यामुळे महिला बचत गटांची उन्नती कशी होईल, यावर भर दिला. शेतक-यांनी पारंपारिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून शेती अधिक उत्पादनक्षम, शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन.🔔कमाल भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करा.🔔दिवाळीनिमित्त उमेद महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन.🔔तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन.🔔प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची विशेष चमुद्वारे तपासणी.🔔शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता जमा.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आतापासून चारा उत्पादनाचे नियोजन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत.🔔PMEGP पोर्टलवरील नवीन  अर्ज प्रक्रियेबाबत अधिकृत सूचना; चंद्रपूरमधील इच्छुक लाभार्थ्यांना स्पष्टतेची  प्रतीक्षा.