The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची विशेष चमुद्वारे तपासणी.

News Image

चंद्रपूर, दि. 30 : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्राम पातळीवर झालेल्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष तपासणी चमुद्वारे, सर्व राज्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

            या पार्श्वभूमीवर विशेष गुणवत्ता पुनरावलोकन चमुद्वारे 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी करण्यात आली. या विशेष तपासणी दौऱ्यात राष्ट्रीय निरीक्षक अजय कुमार राजु यांच्या मार्गदर्शनात मानद राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षक शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव आणि राज्य तांत्रिक सल्लागार डॉ. प्रशांत नगराळे यांनी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या स्तरावरील कामांची निवड करून तपासणी केली. यातील एक काम चालु स्थितीत, एक काम पूर्ण झालेले आणि एक काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल काळातील असावे, असे ठरले. त्यामुळे या कामाची प्राकलने व गुणवत्ता नोंदपुस्तिका आणि इतर सर्व दस्तावेजांची तपासणी करण्यात आली.

            सदर चमूने 23 ऑक्टोबरला वरोरा तालुक्यात वंधली निलजई-आमडी-नवीन सोईट ते माढेळी असा 13.80 किमी. लांबीचा रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष भेट दिली. यंत्रसामुग्री व साधनांचा वापर करून तीन ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आणि सखोल तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला. तपासणीअंति सदर काम गुणवत्ता पूर्वक झाल्याचे निष्पन्न झाले.

            24 ऑक्टोबर रोजी तालुका कोरपना अंतर्गत इजिमा-139, हातलोणी ते इजिमा-139 बोरगाव बुज हा 10 किमी लांबीच्या रस्त्याची वरील प्रमाणेच तपासणी केली व त्यानंतर महारगुडा ते जंगुदेवी या आदिवासी बहुल क्षेत्रातील रस्ता सुध्दा तपासण्यात आला. 26 ऑक्टोबर रोजी या तपासणी दौऱ्यात झालेल्या कामकाजांची चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या राज्य गुणवत्ता समन्वयक वृषाली गाडेकर यांनी दौरा केला. संकेताक क्र. एमएच 08-43 या रस्त्याला भेट देऊन 13.80 किमी रस्त्याचे निरीक्षण केले, असे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन.🔔कमाल भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करा.🔔दिवाळीनिमित्त उमेद महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन.🔔तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन.🔔प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची विशेष चमुद्वारे तपासणी.🔔शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता जमा.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आतापासून चारा उत्पादनाचे नियोजन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत.🔔PMEGP पोर्टलवरील नवीन  अर्ज प्रक्रियेबाबत अधिकृत सूचना; चंद्रपूरमधील इच्छुक लाभार्थ्यांना स्पष्टतेची  प्रतीक्षा.