The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती.

News Image

122 गावांत कीटकनाशक फवारणी.

चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू व मलेरिया (हिवताप) या कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण, रक्तनमुने तपासणी, रुग्णांवर उपचार आणि डास नियंत्रणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर 2026 अखेर जिल्ह्यात मलेरियासाठी 6 लाख 36 हजार 297 रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 134 रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच डेंग्यूच्या 3471 रक्त नमुन्यांची तपासणीत 81 रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे दोन संशयित मृत्यू नोंदविण्यात आले असून, मलेरियामुळे एकही संशयित मृत्यू नोंदविण्यात आलेला नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांमार्फत नियमित ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्तनमुने संकलित करून तपासणीद्वारे आजाराचे निदान निश्चित केले जाते. बाधित रुग्णांना निर्धारित उपचारपद्धतीनुसार संपूर्ण उपचार देण्यावर विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

122 गावांत कीटकनाशक फवारणी; डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यावर भर : डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संवेदनशील गावांमध्ये राष्ट्रीय मानकांनुसार कीटकनाशक फवारणी करण्यात येत असून, आतापर्यंत 122 गावांमध्ये फवारणी पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय डासोत्पत्ती स्थानांचे सर्वेक्षण, साचलेल्या पाण्यातील डासांच्या अळ्यांचे निर्मूलन, अळीनाशक उपाययोजना, आवश्यकतेनुसार धूरफवारणी तसेच पाणीसाठ्यांमध्ये अळीभक्षक गप्पी मासे सोडण्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातील कुलर, पाण्याच्या टाक्या, फुलदाण्या, फ्रिजमागील पाण्याचे ट्रे तसेच इतर भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून किमान एकदा या वस्तू स्वच्छ करून कोरड्या कराव्यात. जिल्ह्यात दर मंगळवारी 'कोरडा दिवस' पाळावा.

नागरिकांना आवाहन : नागरिकांनी डासांपासून संरक्षणासाठी अंगभर कपडे घालावेत, मच्छरदाणी व डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. घरांच्या खिडक्या व दरवाज्यांना जाळ्या बसवाव्यात. विशेषतः बालके, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या संरक्षणाची काळजी घ्यावी. ताप किंवा डेंग्यू-मलेरियाची लक्षणे आढळल्यास विलंब न करता नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सातत्याने पालन करणे यामुळे या आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून डेंग्यू व मलेरियामुक्त जिल्ह्याच्या उद्दिष्टासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !🔔पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद.🔔खाजगी आस्थापनेतील मतदारांना मतदानासाठी चार तासांची सवलत.🔔गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन.🔔उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन.🔔मधुमक्षिका पालन व मध अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती.🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पाच दिवस रंगलेल्या महोत्सवाची भव्य पालखी सोहळ्याने सांगता.