The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन.

News Image

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान.

चंद्रपूर, दि.21 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे या बाबींचा समावेश आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांतर्गत तसेच इतर शासन अंगीकृत संस्थाना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प मुल्याच्या 100 टक्के (जास्तीत जास्त रुपये 250 लाख) इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. प्र

योगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची कमीतकमी 25 लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे. ज्या संस्थाकडे आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध आहे, अशाच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थाना नवीन उत्तीसंवर्धन प्रयोगशाळा मंजूर करण्यात येईल. खाजगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठो, 40 टक्के प्रकल्प मुल्याच्या (जास्तीत जास्त रुपये 100 लाख) प्रती प्रयोगशाळा अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. सदरचा प्रकल्प हा बँक कर्जाशी निगडीत असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची कमीतकमी 25 लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे.

उतीसंवर्धन प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाच्या मानके व निकषानुसार अनुदान मिळाल्यापासुन 18 महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक राहील. तरी, नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखालो अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔पदवीधरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा !🔔पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानादिवशी आठवडी बाजार बंद.🔔खाजगी आस्थापनेतील मतदारांना मतदानासाठी चार तासांची सवलत.🔔गावागावांत वित्तीय समावेशन संतृप्तता शिबिरांचे आयोजन.🔔उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन.🔔मधुमक्षिका पालन व मध अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती.🔔आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पाच दिवस रंगलेल्या महोत्सवाची भव्य पालखी सोहळ्याने सांगता.