Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
चंद्रपूर, दि. 21 : राज्यातील फलोत्पादन व उत्पादन वाढविण्यासाठी मधुमक्षिका पालनाला असलेले महत्व लक्षात घेऊन मधुर क्रांतीचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परागीकरण हा महत्वाचा घटक आहे.
योजनेचा उद्देश : उत्पन्न आणि रोजगार निर्मिती, मधुमक्षिकांच्या दर्जेदार केंद्रक साठ्यांचा विकास, मध आणि इतर पोळे उपादनाच्या परिक्षणासाठी अत्याधुनिक दर्जेदार प्रयोग शाळा स्थापन करणे, ब्लॉक चैनचा विकास करणे इ.
योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी अटी व शर्ती : राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत योजना आणि उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी तसेच त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाचे सर्व सदस्य, संस्था, फर्म, कंपन्या, महिला बचत गट इत्यादी, जे या योजनेअंतर्गत काम करू इच्छितात किंवा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
पायाभूत सुविधांचा लाभ मिळण्यासाठी पात्रता : मधुमक्षिका पालन, मधउत्पादन, प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रात काम करणाऱ्या आणि राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्था, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना लघु अभियान-1 आणि लघु अभियान- 2 अंतर्गत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आर्थिक लाभ किंवा अनुदान मिळेल. वैयक्तिक मधुमक्षिका पालकांच्या बाबतीत राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाकडे आधीच नोंदणीकृत असलेल्या पालकांना प्राधान्य दिले जाईल.
निधीची कमाल मर्यादा : राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाच्या कोणत्याही एका सदस्याला / संस्थेला एका वर्षात सर्व प्रकल्पांसाठी मिळून दिली जाणारी जास्तीत जास्त निधी मर्यादा 45 लाख रूपये असेल. राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणे करीता अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल www.nbhm.gov.in/ www.nbb.gov.in फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: