The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘संवाद सेतू’ कार्यक्रमातून पदवीधर मतदारांना आवाहन.

News Image

पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावी आवाज मिळावा; सुधाकर कोहळे यांना बहुमताने निवडून द्या! 

शिक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या संधी; पदवीधरांच्या शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही.

चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून, शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या मूलभूत प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडणारा प्रतिनिधी निवडण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य दिशा देण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे भूमिका मांडण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जागरूक मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज, चंद्रपूर येथे आयोजित ‘संवाद सेतू’ कार्यक्रमाला आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधत येत्या २३ ऑक्टोबरला श्री. सुधाकर कोहळे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. हरिश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, प्राचार्य लियाकत अली, श्रीमती शोभना, राजदा सिद्दिकी, जमीर शेख, नागाराजू यश बांगडे आदी उपस्थित होते.

आमदार मुनगंटीवार म्हणाले, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. भारतीय संविधानाने विधानपरिषदेच्या माध्यमातून पदवीधरांना प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. पदवीधरांचा प्रतिनिधी हा केवळ सभागृहातील सदस्य नसून, शिक्षणासह समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करून शासनाला आवश्यक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारा दुवा असतो. त्यामुळे पदवीधर मतदारांनी जात-पात आणि धर्म यांचा विचार न करता उमेदवाराची कार्यक्षमता, अनुभव आणि प्रश्न मांडण्याची क्षमता लक्षात घेऊन मतदान करावे.

श्री. सुधाकर कोहळे यांना विधानसभेचा अनुभव असून, पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पदवीधर मतदारसंघातून त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्यास शिक्षण आणि पदवीधरांशी संबंधित प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल, असे मत आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

शिक्षण हे व्यक्तीच्या प्रगतीचे आणि समाजाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येकाला प्रगतीची संधी मिळवून देण्यासाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. वित्तमंत्री असताना चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मूल येथे कृषी महाविद्यालय आणले. महिलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ५० एकर जागेत एसएनडीटीचे केंद्र उभे राहत आहे. याशिवाय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता मिळवून देण्यात आली असून, पुढील वर्षी बीडीएस महाविद्यालय आणण्याचाही प्रयत्न आहे. चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात वेगाने पुढे जावा, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळाव्यात आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यांच्या शैक्षणिक न्यायहक्कांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही आ.मुनगंटीवार यांनी दिली.

मतदान अचूक नोंदविण्याचे आवाहन.

येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधर मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करताना मत अवैध ठरणार नाही, याची विशेष काळजी घेऊन मत अचूक नोंदवावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ‘संवाद सेतू’ कार्यक्रमातून पदवीधर मतदारांना आवाहन.🔔 संविधानच सर्वश्रेष्ठ, रक्षणासाठी सदैव लढत राहणार!  🔔चंद्रपूर जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली.🔔दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या.🔔आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!🔔पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या.🔔मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.