The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा - आमदार किशोर जोरगेवार.

News Image

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह इरई धरणाची पाहणी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बंधारे बांधण्याच्या सूचना.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही. शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचेल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह त्यांनी इरई धरणाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.

यावेळी मनपा आयुक्त नरेश अकुनरी, मुख्य अभियंता चंद्रपूर थर्मल पाँवर स्टेशन अनिल काथोये, उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपायुक्त मनपा शेषराव टाले, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग जलेश सिंग, कार्यकारी अभियंता महेश गवरी, शहर अभियंता मनपा रवींद्र हजारे यांच्यासह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी भाजपचे माजी महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश देवतळे, भाजपा महामंत्री नामदेव डाहुले, रविंद्र गुरनुले, मनोज पाल, गटनेते शेखर शेट्टी, जितेश कुळमेथे, बलराम डोडानी, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकूर, अमोल शेंडे, प्रलय म्हशाखेत्री, प्रवीण गिलबिले यांच्या सहा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, पाण्याची उपलब्धता, आगामी काळातील संभाव्य गरज आणि पाणी वितरणाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचे नियोजन करताना प्रत्येक बाबीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. उपलब्ध पाणीसाठा किती दिवस पुरू शकेल, विविध क्षेत्रांसाठी किती पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार वितरण कसे करावे, याचे स्पष्ट नियोजन प्रशासनाने तयार करावे.

 पाणीपुरवठ्याच्या नियोजनात कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी यावेळी केल्या.केवळ धरणातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून न राहता इतर जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठीही विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत असूनही योग्य देखभाल आणि संवर्धनाअभावी ते निष्क्रिय झाले आहेत.

अशा जलस्रोतांची ओळख करून त्यांना पुन्हा प्रवाहित करण्यासाठी आवश्यक कामे हाती घ्यावीत. नद्या, नाले आणि ओढ्यांमधील पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अश्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.जिल्ह्यात ज्या ठिकाणी बंधारे बांधणे शक्य आहे, त्या ठिकाणांची पाहणी करून बंधार्यांच्या उभारणीचे नियोजन करावे.

शक्य तिथे बंधारा या भूमिकेतून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याला प्राधान्य द्यावे. यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठीही हातभार लागेल. यासोबतच पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करावी. वितरण व्यवस्थेतील पाण्याचे नुकसान कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक उपयोग नागरिकांसाठी करता येईल, अशा उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

इरई धरणातून होणारी वीजनिर्मिती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती प्रक्रियेला बाधा न आणता पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा समतोल राखणारे नियोजन करण्यात यावे. यासाठी संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावेत. पाणी वितरण करताना शेवटच्या टोकावरील वस्त्यांपर्यंत नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल, याची खबरदारी घ्यावी, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढविणार्या दीर्घकालीन कामांनाही गती द्यावी. पाणी अडविणे, पाण्याचे संवर्धन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून कृती आराखडा तयार करावा.

उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि सर्व विभागांमधील समन्वयातून जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलावीत, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा - आमदार किशोर जोरगेवार.🔔महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन.🔔चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन.🔔कमाल भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करा.🔔दिवाळीनिमित्त उमेद महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन.🔔तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन.🔔प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची विशेष चमुद्वारे तपासणी.