The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.

News Image

माविमचा जनजागृतीचा पुढाकार.

चंद्रपूर, दि. 18 : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे तसेच शेतीत राबणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), चंद्रपूरच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून गावागावांत पथनाट्ये आणि आकर्षक भिंतीचित्रांच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर माविम अंतर्गत कार्यरत लोकसंचलित साधन केंद्रे आणि महिला बचत गटांच्या सदस्यांनी गावातील मुख्य चौक, आठवडी बाजार तसेच ग्रामपंचायत परिसरात पथनाट्यांचे सादरीकरण करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.

पथनाट्यातून पाणीबचत आणि जलसंवर्धनाचा संदेश : पथनाट्यांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे, शेतीमध्ये ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणे तसेच दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक बोलीभाषा, संवाद आणि अभिनयाच्या माध्यमातून पाणीबचतीचा संदेश प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला.

शेतकरी म्हणून महिलांच्या नोंदणीसाठी विशेष जनजागृती : शेतीच्या पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. मात्र, अनेक महिलांची शासकीय अभिलेखांमध्ये शेतकरी म्हणून नोंद नसल्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळविताना अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन मोहिमेत शेतकरी महिला नोंदणीच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला.

महिलांनी पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांसह संबंधित यंत्रणेकडे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यामुळे कृषी विषयक योजना, बियाणे व खते अनुदान, पीक विमा, कृषी कर्ज तसेच शेतीपूरक व्यवसायांच्या संधींचा लाभ मिळविणे सुलभ होऊ शकते, याबाबत महिलांना माहिती देण्यात आली.

महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग : या जनजागृती मोहिमेत माविमचे तालुका समन्वयक, सहयोगिनी, समुदाय संसाधन व्यक्ती , गाव प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गटांच्या अध्यक्षा, सचिवा तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे आणि शेतीमध्ये कार्यरत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, या दुहेरी उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण ठरत आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!🔔पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या.🔔मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक  करणाऱ्या २  महिला आरोपींना ताब्यात.🔔रोजगार, शिक्षण क्षेत्राचे बळकटीकरणासाठी पुन्हा संधी द्या : अभिजित वंजारी.🔔७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न.🔔मौजा वाठोड्यात घरझडतीत देशी दारूच्या  २,५०० बाटल्या जप्त;      १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.