Advertisement

कोरोणा भत्याच्या प्रमुख मागणीला घेउन अंगणवाडी महिला तसेच आशा वर्कर जिल्हा परीषदेला धडकल्या कॉ. दहीवडे.

चंद्रपूर, : दबाव टाकुण, धमक्या देवून काम करवून घ्यायचे काम करून घेतेवेळी मोबदला दिल्या जाईल असे सांगायचे आणी काम झाल्यावर मोबदला देण्यासाठी सतत टाळाटाळ करायची हा अनुभव अंगणवाडी महिला तसेच आशा वर्करला अनुभवायला मिळाला स्वताच्या जिवाची पर्वा न करता सतत २४ महिणे कोरोना काळात काम करुन घेण्यात आले.

आज पाच वर्षाचा कार्यकाल लोटूनही घोषीत केलेला मोबदला देण्यात आला नाही. थकीत कोरोना भत्ता तात्काळ देण्यात यावा या प्रमुख मागणीला घेउन प्रा. रमेशचंद्र दहीवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, शारदा लेनगुरे यांचे नेतृत्वात अंगणवाडी महिलांचा विशाल मोर्चा जिल्हा परीषदेवर धडकला. प्रास्ताविक भाषणात राजेश पिंजरकर म्हणाले हा मोर्चा शासनाच्या फसवेगीरीचे विरोधात आहे.

अंगणवाडी महिलांना पेंशन देण्यात येईल, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करण्यात येईल असे लेखी आश्वासन तिन वर्षापुर्वी महाराष्ट्र शासनाने दिले होते तीन वर्ष लोटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. किशोर जामदार म्हणाले अंगणवाडी महिलांचे तसेच आशा वर्करचे जुने प्रश्न अजुनही कायम आहेत त्या प्रश्नांची सोडवणुक करण्याऐवजी नवनविन प्रश्न निर्माण केल्या जात आहे.

अंगणवाडी महिलांना गेल्या चार महिण्यापासून केंद्र शासनाचे मानधन देण्यात आले नाही. अशीच परीस्थिती आशा वर्करची देखिल आहे. प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्य कार्यपालन आधिकाऱ्यांना मिळाले व मागण्याचे निवेदन सादर केले. थकीत कोरोना भत्ता तात्काळ दया, दिलेल्या लेखी आश्वासना नुसार पेंशन तथा ग्रॅज्युटी लागु करा, मोबाईलवर केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.

योजने व्यतीरीक्त इतर कामे अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना सांगण्यात येवू नये. थकीत टि.ए.डी.ए देण्यात यावा. इत्यादी मागण्याचा समावेश होता. आम्रपाली वैदय यांचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपला कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पुनम सरोदे संगीता हनुमंते रेहाना शेख, गुजाबाई डोंगे, संध्या खनके, वर्षा कायरकर, सरीता कामतवार, वैशाली बोकारे, शुभभावना कुरेकार, अंजली बोरेकर, सुशिला कर्णेवार यांनी विषेश परीश्रम घेतले.

आपला

अनिल येनकर

टीप : हे वृत्त संबंधित संघटनेच्या निवेदनावर आधारित असून, त्यातील दावे, विधाने व मते ही संबंधित संघटनेची आहेत. The Patil News त्यांना स्वतंत्रपणे दुजोरा देत नाही. संबंधित पक्षाचे अधिकृत स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही यथास्थित प्रसिद्ध करण्यात येईल.