The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

ज्ञानसेवेच्या प्रदीर्घ पर्वाला विराम; तीन प्राध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा.

News Image

डॉ. परमानंद शेंडे, डॉ. प्रकाशदीप मुनजंकर व डॉ. देवराव पिंपळशेंडे यांच्या सेवाकार्याचा गौरव.

 

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरद्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,  चंद्रपूर येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. परमानंद शेंडे, गणित विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाशदीप मुनजंकर आणि भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. देवराव पिंपळशेंडे यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव  करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष माननीय अरुण घोटेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव माननीय वामनराव मोडक उपस्थित होते. तसेच संस्थेचे माजी उपाध्यक्ष माननीय अशोक घोटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश देहांगकर, तसेच सत्कारमूर्ती डॉ. परमानंद शेंडे, डॉ. प्रकाशदीप मुनजंकर व डॉ. देवराव पिंपळशेंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. तिन्ही प्राध्यापकांनी आपल्या सेवाकाळात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कार्यात दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माननीय  अरुण घोटेकर यांनी तिन्ही प्राध्यापकांच्या सेवाकार्याचा उल्लेख केला. त्यांच्या ज्ञान, कर्तृत्व आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचा महाविद्यालयाला लाभ झाल्याचे त्यांनी नमूद  केले.

प्रमुख पाहुणे माननीय वामनराव मोडक यांनी सत्कारमूर्तींच्या सेवाकार्याचा उल्लेख करताना, “सेवानिवृत्ती हा सेवेचा पूर्णविराम नसून,  आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन केले.

 

संस्थेचे माजी उपाध्यक्ष माननीय अशोक घोटेकर यांनी आपल्या मनोगतात प्राध्यापकांनी  ज्ञानाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडविल्या असून, त्यांचे कार्य महाविद्यालयाच्या स्मरणात कायम राहील, असे गौरवोद्गार काढले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश देहांगकर यांनी तिन्ही प्राध्यापकांच्या कार्याचा आढावा  घेत त्यांच्या शैक्षणिक योगदानासोबतच सहकाऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला.

डॉ. परमानंद शेंडे यांनी आपल्या मनोगतात  सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत महाविद्यालयात कार्यरत असतानाचे अनुभव आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयातील सेवाकाळ हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रकाशदीप मुनजंकर यांनी गणितीय शैलीत आपल्या भावना व्यक्त करताना, “जीवनाच्या समीकरणात मिळालेले सहकारी, विद्यार्थी  आणि संस्थेचे प्रेम हीच माझ्या सेवाकाळातील सर्वात मोठी बेरीज आहे,” असे सांगितले.

 

डॉ. देवराव पिंपळशेंडे यांनी महाविद्यालयातील सेवाकाळ आनंददायी राहिल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले. महाविद्यालयात कार्यरत असताना महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या विचारांचा परिचय झाला आणि त्यांच्या मानवतावादी विचारांनी आपल्या जीवनाला समृद्ध केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. दास यांनी तिन्ही प्राध्यापकांच्या  सहवासातील आठवणी सांगून त्यांच्या सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या. प्रा. सोनटक्के यांनीही सहकाऱ्यांच्या रूपाने लाभलेला स्नेह सेवेनंतरही कायम राहील, अशी भावना व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गवळी यांनी केले. त्यांनी तिन्ही प्राध्यापकांच्या सेवाकाळातील कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकिशोर रंगारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गोपीचंद रामटेके यांनी केले.

 

या सेवापूर्ती सोहळ्यास महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते.

 

टीप : ही बातमी प्राप्त कार्यक्रमाच्या  माहितीनुसार संपादित करण्यात आली आहे.

 

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔ज्ञानसेवेच्या प्रदीर्घ पर्वाला विराम; तीन प्राध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा.🔔शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जिवती तालुक्यात ग्राम रोजगार सहाय्यकांचे १ ऑक्टोबरपासून 'कामबंद' आंदोलन.🔔अमृता फडणवीस यांच्या हस्ते १०० विद्यार्थिनींना सायकल वाटप.🔔राज्यातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंगाला मिळाले भव्य मंदिररूपी छत्र.🔔देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील सेवाभावी उपक्रमांचा विशेष अल्बम मुख्यमंत्र्यांना सुपुर्द.🔔शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ आढावा; अस्वच्छता, एसी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नाराजी.🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.