The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील सेवाभावी उपक्रमांचा विशेष अल्बम मुख्यमंत्र्यांना सुपुर्द.

News Image

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरे; ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

चंद्रपूर : ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या तसेच ५६ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या आठवणींचा विशेष अल्बम तयार करण्यात आला आहे. हा विशेष अल्बम आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सन्मानपूर्वक सुपुर्द केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संजय कंचर्लावार आणि भालचंद्र दाणव यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या सेवा सप्ताहांतर्गत विविध समाजोपयोगी आणि जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते भव्य रक्तदान अभियानाचे. चंद्रपूर शहरात तब्बल ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणारे कार्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनसेवा, विकास आणि समाजहिताच्या विचारांनी प्रेरित होऊन राबविण्यात आलेल्या या रक्तदान अभियानाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चंद्रपूरच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविणारा ठरला.

यावेळी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आली. समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून जनसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातून आणि प्रेरणेतून चंद्रपूरमध्ये जनसेवेचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रयत्न सुरू आहे. ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’ला नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या जनसेवेवरील जनविश्वास वाढविणारा ठरला आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील सेवाभावी उपक्रमांचा विशेष अल्बम मुख्यमंत्र्यांना सुपुर्द.🔔शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ आढावा; अस्वच्छता, एसी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नाराजी.🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.