The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ आढावा; अस्वच्छता, एसी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नाराजी.

News Image

रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या; शौचालये २४ तास सुरू ठेवण्यासह स्वच्छता, फायर सेफ्टी व पिण्याच्या पाण्याबाबत कडक सूचना.

चंद्रपूर | प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्या तसेच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान काही ठिकाणी आढळलेली अस्वच्छता, बंद असलेले एसी, कर्मचाऱ्यांची कर्तव्यावरील गैरहजेरी आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्षात रुग्णांना सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निवृत्ती जिवने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विवेक अंबोले, विद्युत विभागाचे उपअभियंता भूषण येरगुळे, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश देवतळे, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, नगरसेविका सविता कांबळे, सरला कुळसंगे, शीतल गुरनुले, ज्योती जिवने, नगरसेवक भालचंद्र दाणव, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, अमोल शेंडे, करणसिंह बैस, सुमीत बेले आदी उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश.

रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असली पाहिजे. मात्र, पाहणीदरम्यान काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

रुग्णालय परिसराची नियमित स्वच्छता व पाहणी करून परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवावा. स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल.

काही कर्मचारी आपल्या कर्तव्यावर नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही प्राप्त होत असल्याचे आमदारांनी यावेळी सांगितले. रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे.

कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सेवा व्यवस्थेत शिस्त राखावी, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले.

बंद असलेले एसी तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना.

रुग्णालयातील विविध विभागांमध्ये एसी बंद असल्याच्या बाबीवरही आमदार जोरगेवार यांनी रोष व्यक्त केला. उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी रुग्णालयातील आवश्यक सुविधा सुरळीत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद असलेले एसी तातडीने दुरुस्त करून रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

रुग्णालयातील शौचालये २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश.

रुग्णालयातील शौचालये केवळ रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याच्या बाबीचीही आमदारांनी दखल घेतली. रुग्णालय हे २४ तास कार्यरत असते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी शौचालयांची सुविधा देखील २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे.

शौचालये २४ तास सुरू ठेवण्यासोबतच त्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

फायर सेफ्टी यंत्रणा सक्षम ठेवण्यावर भर.

रुग्णालयाच्या दृष्टीने फायर सेफ्टी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम आणि कार्यरत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

फायर एक्स्टिंग्विशर, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच विद्युत व्यवस्थेची नियमित तपासणी करावी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि यंत्रणा सदैव सज्ज ठेवाव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले.

रुग्णांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना.

रुग्णालयात उपचारासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात असतो. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्याने, संयमाने आणि आपुलकीने वागणे आवश्यक आहे, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

रुग्णांना अनावश्यक त्रास होणार नाही तसेच त्यांना त्यांच्या उपचाराबाबत योग्य आणि आवश्यक माहिती वेळेत मिळेल, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्ण व नातेवाईकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे आमदारांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणांची नियमित स्वच्छता करावी तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून ते सुरक्षित असल्याची खात्री करावी. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहज उपलब्ध होईल, अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने येथे उपलब्ध असलेल्या प्रत्येक सुविधेची नियमित देखभाल होणे आवश्यक आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

नवजात शिशूंसाठी ह्युमन मिल्क बँक सुरू करणार.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात शिशूंसाठी ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

नवजात बालकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि पोषक मानवी दूध उपलब्ध व्हावे, यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयातील मूलभूत सुविधांपासून नवजात बालकांसाठीच्या विशेष सुविधांपर्यंत प्रत्येक बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाचक प्रतिक्रिया (1)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
SANDIP ZAGADKAR 02 Sep, 2026 01:53 PM
Verry good
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपूर जिल्ह्यातील 3410 शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त.🔔मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या पाच फरार आरोपींचा शोध सुरू.🔔धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल.🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.🔔पदवीधरांच्या हक्कांसाठी ‘मिशन जॉब्स’ आणि ‘मिशन एक्झाम’चा संकल्प.🔔‘भूमिपुत्रांचा एल्गार’ नाटिकेतून आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेला उजाळा.🔔दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर.🔔मुख्यमंत्री पशुधन योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू नाही; शेतकरी व बेरोजगारांचे लक्ष!