The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्हाधिका-यांच्या हस्ते तंबाखुमुक्त युवा अभियानाचा शुभारंभ.

News Image

चंद्रपूर, दि. 02 : युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करणे, मुखाचा कर्करोग व इतर तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करणे तसेच निरोगी आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज (दि. 2) करण्यात आला.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, तंबाखुमुक्त युवा अभियान 4.0 अंतर्गत शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन, शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त परिसर निर्माण करणे, कोटपा कायदा, 2003 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध आणि अल्पवयीनांना तंबाखू विक्रीवरील बंदीबाबत जनजागृती, रॅली, प्रभातफेरी, चित्रकला, निबंध स्पर्धा आणि तंबाखूमुक्तीची शपथ, तसेच तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन व आरोग्यविषयक मदत हे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, तरुण पिढीमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. आपली युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून, याबाबत नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कडक कारवाई करावी. वसतीगृह तसेच आश्रमशाळेसुध्दा नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. जनजागृतीपर संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, दंत शल्य चिकित्सक डॉ. संदीप पिपरे, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. श्वेता सावलीकर, अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, प्रणय कांबळे, उपशिक्षणाधिकारी जी.बी. चवरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकर आदी उपस्थित होते.

विविध विभागाच्या वतीने करण्यात आलेली कार्यवाही : सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (कोटपा) अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत 396 जणांवर दंडात्मक कारवाई करून 39 हजार 600 रुपयांची वसुली करण्यात आली. याच कालावधीत पोलिस विभागाच्या वतीने 2459 जणांवर कारवाई तर 4 लक्ष 85 हजार 677 रुपये दंड आकारण्यात आला. अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सदर कालावधीत 27 लक्ष 29 हजार 477 रुपये किमतीचा 1331 किग्रॅ साठा जप्त करण्यात आला. जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये 314 शाळा तंबाखुमुक्त, सन 2025-26 मध्ये 322 शाळा  तर एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत आतापर्यंत 65 शाळा तंबाखुमुक्त करण्यात आल्या आहेत.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपूर जिल्हा ‘सुरक्षित प्लस’ करण्याचा संकल्प.🔔6 नोव्हेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन. 🔔जिल्हाधिका-यांच्या हस्ते तंबाखुमुक्त युवा अभियानाचा शुभारंभ.🔔आदिवासी आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा बोर्डा येथे शुभारंभ.🔔इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा - आमदार किशोर जोरगेवार.🔔महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन.🔔चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन.