The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा बोर्डा येथे शुभारंभ.

News Image

पारंपरिक स्वागत, आदिवासी नृत्याने रंगला उद्घाटन सोहळा.

चंद्रपूर, दि. 02 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज (दि.2) शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बोर्डा येथे उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात झाला.

स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पिपरे, उमेश कडू आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून तसेच क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांच्या औपचारिक प्रारंभाची घोषणा करण्यात आली. विविध बीटनिहाय सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध पथसंचलन पार पडले. सेवा संकल्प अभियानांतर्गत 62 आश्रमशाळा व वसतिगृहांमधील जवळपास 8 हजार विद्यार्थ्यांची दंत तपासणी केल्याबद्दल दंतरोग व मुखरोग तज्ञ डॉ. संदीप पिपरे यांचा गौरव करण्यात आला.

शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक आदिवासी पारंपरिक नृत्याने उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली. या सादरीकरणातून आदिवासी समाजाची समृद्ध लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवनाचे सुंदर दर्शन घडले.

प्रकल्प अधिकारी मा. विकास राचेलवार, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्रीडा स्पर्धांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांनाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. मिलिंद कांबळे, यांनी, क्रीडा स्पर्धा आणि आंतरप्रकल्पीय उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती, अनुभव व ज्ञानाचे आदानप्रदान होऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारे विकसित होते, याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात कल्पना क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम व स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये केवळ विजय मिळविण्याच्या दृष्टीने नव्हे, तर नवीन कौशल्ये शिकण्याच्या, स्वतःची क्षमता ओळखण्याच्या आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याच्या दृष्टीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेतील बोर्डा केंद्र विरुद्ध देवाडा केंद्र हा उद्घाटन सामना खेळविण्यात आला. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात एकूण 1058 खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यांच्या व्यवस्थेसाठी जवळपास 200 अधिकारी-कर्मचारी व सहाय्यक मनुष्यबळ कार्यरत आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार (शिक्षण), यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रकल्प क्रीडा समन्वयक सुरेश श्रीरामे यांनी क्रीडा स्पर्धांच्या नियोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन अनुराधा लाड यांनी तर रामदास खवशी यांनी आभार मानले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔चंद्रपूर जिल्हा ‘सुरक्षित प्लस’ करण्याचा संकल्प.🔔6 नोव्हेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन. 🔔जिल्हाधिका-यांच्या हस्ते तंबाखुमुक्त युवा अभियानाचा शुभारंभ.🔔आदिवासी आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा बोर्डा येथे शुभारंभ.🔔इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा - आमदार किशोर जोरगेवार.🔔महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन.🔔चंद्रपूर जिल्हा न्यायालयात वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन.