The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ.

News Image

4 लाख 89 हजार 926 बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट.

चंद्रपूर, दि. 27 : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचा शुभारंभ आज (दि. 27) प्राथमिक आरोग्य केंद्र, चिचपल्ली अंतर्गत उपकेंद्र बोर्डा येथील आश्रमशाळेत करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 4 लाख 89 हजार 926 बालक-किशोरवयीनांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्नेहल कासारे यांनी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे महत्त्व विशद करतांना सांगितले की, बालकांमधील जंतसंसर्गामुळे त्यांच्या शारीरिक वाढीवर, पोषणस्थितीवर तसेच एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जंतसंसर्गामुळे रक्तक्षय, अशक्तपणा आणि पोषणाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे.

जंतनाशक गोळ्यांच्या नियमित व योग्य वापरामुळे आतड्यांतील जंतसंसर्गाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. बालकांच्या आरोग्याचे संरक्षण, पोषणस्थितीत सुधारणा आणि निरोगी बालपणाची निर्मिती, यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरते. जिल्ह्यातील शाळा, आश्रमशाळा तसेच अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून पात्र बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील सर्व पालक, शिक्षक, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व अधीक्षक तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. पात्र बालकांपैकी एकही बालक या मोहिमेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन श्रीमती लाड यांनी तर आभार आश्रमशाळेचे प्राचार्य रामदास खावशी यांनी मानले. कार्यक्रमाला आश्रमशाळेच्या अधिक्षिका शीतल सिडाम, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमेद खोब्रागडे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका सुरेखा सुत्राळे, सुरेखा ठाकरे व भावना सोंडावले, सुभाष रंगारी, जिल्हा परिषद शाळेचे श्री. काटकर, तसेच आश्रमशाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔परिवहन वाहनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे.🔔सहकारी संस्थेसंदर्भात हरकती असल्यास 29 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आवाहन.🔔जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ.🔔स्था.गु.शा चंद्रपूर व पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांची संयुक्त कार्यवाही कटर मशीन चोरी करणाऱ्या आरोपीचे ताब्यातून 50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔डीजेला फाटा; पारंपरिक सनई वाद्याच्या  सुरांत शारदा  देवीला निरोप!🔔चंद्रपूर महानगरातील ३९० पैकी  ३९० बूथवर ‘मन की  बात’चे श्रवण.🔔तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – डॉ. व्यवहारे.🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.