Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
चंद्रपूर, दि. 28 : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्जांच्या नोंदणी बाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आढावा बैठक गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे ही बैठक होणार आहे.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) तसेच इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्जांची ऑनलाइन स्वीकृती 6 जुलै 2026 पासून सुरू करण्यात आली आहे.
मात्र, महाडीबीटी डॅशबोर्डवरील माहितीनुसार भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे 259, फ्रीशिप योजनेचे 4 आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे 45 अर्ज नोंदविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज 100 टक्के नोंदविण्यासाठी महाविद्यालयांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक व बिगरव्यावसायिक तसेच अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत महाविद्यालयनिहाय शिष्यवृत्ती अर्जांची सद्यस्थिती, प्रलंबित अर्ज, नवीन व नूतनीकरण अर्जांची नोंदणी तसेच नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी संख्या, नोंदणीकृत व प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांची अद्ययावत माहिती घेऊन बैठकीस न चुकता उपस्थित राहावे. तसेच एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अर्ज नोंदणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: