The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर.

News Image

आसापूर (ता. जिवती) येथे आयोजन ; 338 जणांनी घेतला लाभ.

चंद्रपूर, दि.12 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या आसापूर (ता. जिवती) येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, डॉ. विश्व मानव रुहानी केंद्राचे श्री. बोगावार, महाराष्ट्र राज्य स्त्री रोग संघटनेच्या डॉ. मनिषा घाटे, डॉ. कल्पना गुलवाडे, विभागीय नियंत्रक अशोक वाडिभस्मे आदी उपस्थित होते. आसापूर व लगतच्या गावांतील नागरिकांना आरोग्यविषयक सोयीसुविधा, ज्या नागरिकांकडे आधारकार्ड तसेच शिधापत्रिका नाही, अशा नागरिकांना आधारकार्ड व शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकूण 338 नागरिकांनी सदर सुविधेचा लाभ घेतला.

विशेष म्हणजे या शिबिराच्या निमित्ताने आसापूर या दुर्गम व शासकीय सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या गावातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत राजुरा -आसापूर-जिवती या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गावातील दोन बोअरवेलची सुधारणा व दुरुस्ती करून त्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या. या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक व पाणीपुरवठ्यच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा, कायदेविषयक मार्गदर्शन आणि मूलभूत सुविधांचा लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. विविध शासकीय विभाग, वैद्यकीय संस्था, सेवाभावी संस्था आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात विश्व मानव रूहानी केंद्र, नवान नगर (हरियाणा) या सेवाभावी संस्थेच्या चंद्रपूर शाखेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. तसेच डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सा. कन्नमवार वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, पंडित दिनदयाल उपाध्याय कॅन्सर केअर सेंटर आणि चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी यांच्यासह इतर संस्थांनी व विभागांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदीचा हिशोब उपलब्ध.🔔पदवीधरांच्या हक्कांसाठी ‘मिशन जॉब्स’ आणि ‘मिशन एक्झाम’चा संकल्प.🔔‘भूमिपुत्रांचा एल्गार’ नाटिकेतून आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेला उजाळा.🔔दुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात विधीसेवा प्राधिकरणतर्फे विशेष शिबीर.🔔मुख्यमंत्री पशुधन योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू नाही; शेतकरी व बेरोजगारांचे लक्ष!🔔मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान.🔔दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज.🔔अनधिकृत पाणी उपशाविरोधात होणार कठोर कारवाई.