The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी.

News Image

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाचे लवकर निदान करण्यावर विशेष भर.

चंद्रपूर, दि. 10 : असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची  घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या 100 दिवसांच्या विशेष अभियानांतर्गत आतापर्यंत उच्च रक्तदाबासाठी 2 लाख 11 हजार 915  तर मधुमेहासाठी 1 लाख 50 हजार 410 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

हे अभियान 1  सप्टेंबर ते 10  डिसेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि विविध प्रकारच्या कर्करोगांचे वेळेत निदान करणे, संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करणे तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जात आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत तोंडाच्या कर्करोगासाठी 1 लाख 4 हजार 745, स्तन कर्करोगासाठी 26 हजार 959  तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी 20 हजार 617 महिलांची तपासणी करण्यात आली. मागील एक वर्षात मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी न केलेले तसेच मागील पाच वर्षांत कर्करोगाची तपासणी न केलेले नागरिक ओळखून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.  या नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करून संभाव्य आजारांचे लवकर निदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहे. लवकर तपासणी, योग्य निदान आणि वेळेवर उपचार या उद्दिष्टाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 30 वर्षांवरील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. नागरिकांनी आपल्या गावात किंवा वॉर्डमध्ये येणाऱ्या आरोग्य पथकाकडून अथवा जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. तपासणीत काही संशयास्पद आढळल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील तपासणी व उपचार पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई... 40 लाखांचा 16 चक्का पल्ला गाडी व 10 ब्रास रेती जप्त.🔔गोंदिया जिल्ह्यात अभिजित वंजारी यांचा दौरा; शिक्षक, पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा.🔔सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे 348 विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी.🔔‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी.🔔जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये 35 हजार केशर आंबा लागवड.🔔बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश.🔔बल्लारपूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी.🔔‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी.