The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

बहुजन समाज पार्टीची चंद्रपूर येथे संघटन समीक्षा बैठक उत्साहात संपन्न.

News Image

चंद्रपूर, दि. ४ जून २०२६ : बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा समिती व जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची संघटन समीक्षा बैठक बहुजन हिताय नागरी पतसंस्था, तुकूम, एस.टी. वर्कशॉप समोर, चंद्रपूर येथे संपन्न झाली.

सदर बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक मा. ॲड. सुनीलजी डोंगरे साहेब (प्रदेश अध्यक्ष, बसपा, महाराष्ट्र) होते. मा. डॉ. मोहनजी राईकवार साहेब (प्रदेश महासचिव, बसपा, महाराष्ट्र) यांच्या निर्देशानुसार तसेच मा. इंजी. महेंद्रजी मकेश्वर साहेब (प्रदेश सचिव, बसपा, महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मंचावर मा. डॉ. मोहनजी राईकवार साहेब, मा. इंजी. महेंद्रजी मकेश्वर साहेब,ॲड. पाटील सर, सेवानिवृत्त आयकर आयुक्त मा. संजयजी ठूल, लोकसभा प्रभारी मा. धर्मेशजी निकोसे तसेच चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. रत्नाकरजी सत्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. डॉ. विश्वनाथ लाडे यांनी केले.

यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका तथा बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मा. सौ. सोनियाताई प्रशांत उंदीरवाडे व मा. प्रशांतभाऊ उंदीरवाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

बैठकीत मा.ॲड. सुनीलजी डोंगरे साहेब यांनी पक्ष संघटना बळकट करण्याबाबत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, गाव ते शाखा स्तरापर्यंत पक्ष मजबूत करणे, नवीन कार्यकर्ते जोडणे व बूथस्तरावर संघटन उभारणी यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सेवानिवृत्त आयकर आयुक्त मा. संजयजी ठूल यांची नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच पक्षाच्या विचारधारेचा प्रसार व संघटनात्मक मजबुतीसाठी मिनी कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. गाव ते शाखा स्तरावर संघटन विस्तारासाठी नवीन दिशा व घोषवाक्य देण्यात आले.

बैठकीस जिल्हा, विधानसभा व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव शुभाजी पेटकर यांनी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.