The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन.

News Image

महाकाली मातेची मूर्ती देत आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत.

चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आज चंद्रपुरात आगमन झाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. आमदार किशोर जोरगेवार यांनीही माता महाकालीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख पंकज भोयर यांचीही उपस्थिती होती. त्यांचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीची मूर्ती देऊन स्वागत केले.

चंद्रपूर दौऱ्यादरम्यान अरुण लखाणी यांनी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या समवेत चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या श्री माता महाकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले व राज्याच्या प्रगतीसह मतदारसंघाच्या विकासासाठी प्रार्थना केली.यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लखाणी यांच्या उमेदवारीचे स्वागत करताना भाजप संघटनेच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर या निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला वेग दिल्याचे दिसून आले.

अरुण लखाणी यांनीही पक्षाने दिलेल्या संधीबद्दल केंद्रीय व राज्य नेतृत्वाचे आभार मानले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.