The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून 17 बालकांना जीवनदानाची नवी आशा.

News Image

हृदयात छिद्र असलेल्या बालकांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरातून अनेक गरजू बालकांना जीवनदानाची नवी आशा मिळाली आहे. या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी तब्बल ३३ बालकांच्या हृदयात छिद्र (होल) असल्याचे निदान झाले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात 17 बालकांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी ट्रेन ने मुंबई येथे रवाना करण्यात आले आहे.मुंबई येथील किम्स रुग्णालयात या बालकांवर अत्याधुनिक पद्धतीने निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण उपचार प्रक्रियेसाठी लागणारा खर्च विविध शासकीय योजनांमधून तसेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून उचलण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणार्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.या बालकांच्या मुंबई प्रवासाची व्यवस्था, राहण्याची सोय, जेवण, वैद्यकीय तपासण्या तसेच शस्त्रक्रियेपर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्यात येत असून पालकांनाही आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. उपचारासाठी पाठविण्यात आलेली सर्व बालके ही १८ वर्षांखालील असल्याने त्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. गरजू व गंभीर आजारांनी ग्रस्त बालकांना योग्य वेळी उपचार मिळावेत आणि आर्थिक अभावामुळे कोणत्याही मुलाचे आयुष्य धोक्यात येऊ नये, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार सातत्याने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या चेहर्यावर आशेचा किरण निर्माण झाला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणतेही बालक उपचारांपासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. आरोग्य शिबिरातून हृदयविकाराने ग्रस्त बालकांची वेळेत तपासणी होऊन त्यांना योग्य उपचार मिळत आहेत, ही समाधानाची बाब आहे. या चिमुकल्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येईल. प्रत्येक बालकाला निरोगी आयुष्य मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

पाच महिन्यांच्या चिमुकलीसह सहा महिन्यांच्या बालकावरही होणार शस्त्रक्रिया.

मुंबई येथे उपचारासाठी रवाना करण्यात आलेल्या बालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा तसेच सहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे. इतक्या लहान वयात हृदयात छिद्र असल्याचे निदान झाल्याने पालकांवर मोठे संकट ओढवले होते. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून या बालकांना वेळेत उपचाराची संधी उपलब्ध झाली आहे.या दोन्ही चिमुकल्यांसह सर्व बालकांवर मुंबई येथील किम्स रुग्णालयात निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च विविध शासकीय योजना व आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.