The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !

News Image
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे १०३ कोटी ८ लाख ६३ हजार ३६१ रुपये धान चुकारे मंजूर.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. श्री. छगनजी भुजबळ यांना लिहिले होते पत्र.
  चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेंतर्गत धानाचे प्रलंबित चुकारे तातडीने मिळावेत, यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. श्री. छगनजी भुजबळ यांना पत्र लिहीले होते. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री. अनिल डिगीकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धान खरेदीचे १०३ कोटी ८ लाख ६३ हजार ३६१ रुपये इतके चुकारे मंजूर करण्यात आले आहेत. आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीची दखल घेत प्रधान सचिवांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धानाच्या चुकाऱ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने संबंधित निर्णयाची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये खरीप पणन हंगाम २०२५-२०२६ मधील धानाचे चुकारे देण्यात आले आहे. "खरीप पणन हंगाम २०२५-२६ मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत १८ जानेवारी २०२६ पर्यंत एकूण ४,३५,१४७.०५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीचे १०३,०८,६३,३६१ रुपये इतके चुकारे शासनाच्या निकषानुसार प्राप्त झाले असून, त्याद्वारे १४,२२९ शेतकऱ्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे. धान खरेदी होऊनही अनेक शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली होती. त्याचवेळी प्रलंबित रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली. या मागणीला प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी ना. श्री. छगनजी भुजबळ यांना पत्र लिहीले. ‘चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात आधारभुत किमतीनुसार ५ डिसेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष धान खरेदी सुरु झाली. आजपर्यंत २३६९ रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे ४७४२८६.४६ क्विटंल धानाची खरेदी करण्यात आली होती. पण शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या धानाचे चुकारे मिळालेले नाहीत,’ याकडे आ. मुनगंटीवार यांनी पत्रामधून लक्ष वेधले होते. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मंजूर करण्यात आले असून त्याबद्दल कायम शेतकऱ्याप्रती संवेदनशील असलेले नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
ब्रेकिंग न्यूज़
🔔आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी.🔔चंद्रपूरच्या वाहतूक कोंडीवर रिंगरोड च्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाय करा - आमदार किशोर जोरगेवार.🔔पीएम श्री शहीद भगतसिंग प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव.🔔मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔मोरवा येथील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करा!🔔छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आमदार सुधीर मुनगंटीवार.🔔जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.🔔लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : आ. सुधीर मुनगंटीवार.