दि. 26/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मुल हद्दीत नांदगाव येथे नाकाबंदी करून पिकअप वाहन क्र. MH-34-BZ-9152 ताब्यात घेऊन आरोपी नामें 1) स्वप्नील प्रल्हाद कुलमेथे (वय 32, चालक) रा. येरगाव ता.पोंभुर्णा 2) विजय खुशाल बट्टे (वय 27) रा. घडोली ता. गोडपिपरी यांना ताब्यात घेऊन पिकअप वाहनातील 8 नग गोवंश (बैल) ताब्यात घेऊन सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, जि. चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मुल अप. क्र. 619/2025 कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज) भा.प्रा.क्रू.वा.प्र.अ. 1960 r/w 5(अ), 9, 11 म.प्रा.सं.अ. 1976 (सुधारित 2015) r/w 325,3(5), 49 BNS 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
जप्त माल :
पिकअप वाहन व गोवंश – अंदाजे किंमत ₹6,60,000/-
आरोपींची नावे व पत्ते :
1. स्वप्निल प्रल्हाद फुलझेले वय 32 वर्षे रा. येरगाव, बस स्टॉप जवळ,ता. पोंगुर्णा, जि. चंद्रपूर,
2. विजय कुशाल बट्टे, वय 27 वर्षे,रा. घडोली,ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर,
पाहिजे आरोपी : फैयाज , मो. नं. 8074279055
रा. करीमनगर ,जि. तेलंगणा,
सदर दोन्ही आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले.
कार्यवाही :
उपविभाग मुल, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर








