चंद्रपूर,दि.०२ मे – महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२६ चा प्रतिष्ठेचा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पावर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात उत्कृष्ट व अमूल्य कार्य केल्याबद्दल चंद्रपूर येथील पंकज किशन बेले यांना बहाल करण्यात आला.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोक उईके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी तसेच अनेक खेळाडूंना घडविण्यात श्री बेले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेऊन शासनाने हा सन्मान जाहीर केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हा व राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी: वसुमना पंत. जिल्हा पोलीस अधीक्षक:सुदर्शन मुमक्का.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी:पुलकीत सिंह.मनपा आयुक्त:अकुनुरी नरेश तसेच माननीय आ. किशोरभाऊ जोरगेवार यांचा प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी श्री बेले यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जिल्हा पावर लिफ्टिंग संघटनेच्या वतीने तसेच विविध सामाजिक,क्रीडा व शैक्षणिक संस्थांकडून पंकज बेले यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.त्यांच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे.पंकज बेले यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
पावर लिफ्टिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पंकज बेले यांना ‘जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’.










